संपादकः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः आपल्यातील संवेदनशीलता जागी ठेवली तर शब्द आपले मित्र बनतात.शेताच्या बांधावरच्या बाभळीकडे पाहूनही कविता सुचते,असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, चित्रकार, गीतकार,निरूपणकार विष्णू थोरे यांनी चांदवडच्या श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी दिनाच्या निमित्ताने केले. स्वरचित एकापेक्षा एक सरस कविता आपल्या गोड आवाजात त्यांनी विद्यार्थ्यांपुढे सादर केल्या आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच मराठी भाषेसाठी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवीवर्य कुसुमाग्रज यांचे योगदान व मराठी भाषेची महती विषद केली. मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे होते.याप्रसंगी पर्यवेक्षक प्रकाश आहेर मराठी विभाग प्रमुख अडसरे सर, कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.वाल्मीक कुरणे,
सर्व प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संगीतशिक्षका रूपाली कोतवाल व गीतमंचने तात्यासाहेबांना कवितेतून अभिवादन केले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी सेजल आवारे हिनेआपले मनोगत व्यक्त केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय लोहकरे यांनी मराठीची गौरवशाली परंपरा सांगून सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता दिवटे यांनी केले. आभार शिवदास कापडणे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments