सदगुरू रक्षा न्युज : सुनिलआण्णा सोनवणे
*पिंपळगाव बसवंत :* यातील तक्रारदार यांनी त्यांच्या आईचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना धन्वंतरी हॉस्पिटल पिंपळगाव या ठिकाणी दाखल करण्यात आले होते त्यांची शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याचा बदल्यात डॉ. महेश परदेशी यांनी तक्रारदार यांच्याशी संभाषण पंच साक्षीदार यांच्या समक्ष सात हजार रुपये लाचेची मागणी केली सदर संभाषण दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर महेश बुब यांनी लाचेची मागणी करण्याकरता प्रोत्साहन दिले तसेच डॉक्टर महेश परदेशी यांनी सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम सात व कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे सदर घटनेत सापळा माननीय श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर (पोलीस अधीक्षक नाशिक ) यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून मीरा आदमाने (पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक )
सहाय्यक सापळा अधिकारी गायत्री जाधव (पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग नाशिक ) .पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके , चालक पोलीस नाईक परशुराम जाधव सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक यांच्या टीमने सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली
याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क करावा
दूरध्वनी क्रमांक
0253 - 2578 230
व टोल फ्री क्रमांक 1064
Post a Comment
0 Comments