जिल्हा प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा
चांदवड : तालुक्यात पंचायत समितीच्या स्तरावर पाणीपुरवठा विभाग अंतर्गत मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा काळाबाजार अनागोंदी कारभार चालु असुन याकडे मात्र तालुक्यातील कोणत्याही वरीष्ठ जबाबदार यंत्रणेचे लक्ष नाही.
चांदवड तालुक्यात बरेच ठिकाणी जल जीवन मिशनचे बोगस कामे चालू असून तर काही ठिकाणी कामे बंद पडलेली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे पिण्याचे पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याचे व दुरुस्तीचे कारण सांगून टँकरचा पाणीपुरवठा तालुक्यातील बऱ्याच खेडोपाडी गावात नियमित होत नाही. तर काही ठिकाणी आर्धेच पाण्याचे टँकर भरून टाकले जाते. काही ठिकाणी नियमित टँकर ट्रिपा न टाकता बोगस पाणीपुरवठा टँकर ट्रिपा दप्तरी कागदोपत्री दाखवुन काळाबाजार अनागोंदी कारभार चालू आहे.
परसुल ग्रामपंचायत अंतर्गत चांदवड रस्त्याची आदिवासी वस्ती व गावासाठी दररोज दोन टँकर तर भरवीर रोड आदिवासी वस्तीसाठी दिवसाआड एक टँकर मंजूर असून मात्र या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा केला जात नाही परंतु कागदपत्रे पाणीपुरवठा टँकरच्या फेऱ्या ह्या बरोबर दाखवून दप्तरी बोगस नोंदी केल्या जातात.
चांदवड रस्त्याच्या परसुल गावातील आदिवासी वस्तीवर नळ योजना कार्यान्वित असून टाकीला नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्याने अक्षरशः आदिवासी समाजाच्या महिला डोईवर दोन ते तीन हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात.
तसेच भरविर रस्त्याचे आदिवासी वस्तीवर एक दिवसाआड टँकर मंजूर असून त्या ठिकाणी मागील आठवड्यात एक दिवसाचा टँकर पाणीपुरवठा गायब करून व दप्तरी नोंद दाखवुन काळा बाजार सुरु केला. आदिवासी वस्तीला पाण्याचा टँकर पाठविल्याचे दाखवून पाणीपुरवठा टॅंकरच गायब झाल्याने त्या वस्तीवर पाणी पुरवठा समस्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पंचायत समिती स्तरावर चौकशी केली असता त्या वस्तीवर पाणी टँकर पाठवल्याचे सांगण्यात येऊ दप्तरी नोंद आहे मात्र वस्तीवर पाहण्याचा टँकरच मिळाला नाही. याबाबत चौकशी केली असता पंचायत समिती स्तरावर टँकर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मोठा अनागोंदी कारभार चालू असून ग्रामीण खेडोपाडी भागात टँकरचे पिण्याच्या पाण्याची पूर्ण टँकर भरून फेरे होत नसताना देखील बोगस टँकर पाणीपुरवठा केल्याच्या दप्तरी नोंदी केल्या जातात.
परसुल या ठिकाणी मागील आठवड्यात भरवीर रस्त्याच्या आदिवासी वस्तीवर पाण्याचा टँकर पुरवठा न करता पंचायत समिती दप्तरी पाणी पुरवठा केल्याची टँकर नोंद केली कशी? या चौकशीच्या माध्यमातून या पंचायत समितीच्या टँकर पाणीपुरवठ्याचा अनागोंदी कारभार बाहेर आलेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे टँकर पाणीपुरवठा दप्तरी कामकाज नियमित दररोज दैनंदिन पूर्ण केले जात नाही. चांदवड तालुक्यातील खेडोपाडी ग्रामीण भागात प्रति दिवस किती टँकर ट्रिप पाणीपुरवठा केला जातो. याबाबतची माहिती दररोज दप्तरी नोंद केली जात नाही. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे पाण्याच्या टँकर ट्रिपचा हिशोब दररोज जुळता केला जात नाही. अशा या अनागोंदी कारभारावर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे संपूर्ण नियंत्रण सुटलेले आहे.
टॅंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या बोगस टँकरच्या नोंदी करण्याची प्रथा बंद करून दररोजचे काम दैनंदिन वेळीच पूर्ण करून अनागोंदी कारभाराचा काळा बाजार बंद करावा. व जनतेला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत,नियमित करावा. ग्रामीण भागात एकाच गावाला एकच टॅंकरने नियमित पाणीपुरवठा करण्याची प्रथा बंद करावी. ग्रामीण भागात टँकर बदलुन पाठविण्याची व्यवस्था अस्तित्वात आणावी जेणेकरून टँकर ट्रिप जुळवाजवळ करण्याची पंचायत समिती दप्तरी कामकाजाची अनागोंदी पद्धती बंद होईल.
या काळाबाजार अनागोंदी प्रकाराकडे जिल्हाधिकारी प्रशासन मा.उपविभागीय अधिकारी व मा. तहसीलदार साहेब यांनी वेळीच लक्ष घालून पंचायत समिती स्तरावर दैनंदिन कामकाज त्याच दिवशी टँकर ट्रिपंच्या दप्तरी नोंदी करून दैनंदिन कामकाज वेळीच पुर्ण केले जाईल अशी कार्यवाही करुन दखल घ्यावी.
Post a Comment
0 Comments