चांदवड : श्री नेमिनाथ जैन विद्यालयात नाटिकेच्या माध्यमातून संदेश देत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
थोर शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर वेंकटरमन यांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरी केली जाते.
त्या निमित्ताने विद्यालयाचे पर्यवेक्षक रविंद्र पवार यांनी सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. या निमित्ताने विद्यालयातील इ. ७ वी च्या सायली केदारे व इतर विज्ञानाचे महत्त्व पटवून देणारी नाटिकेचे सादरीकरण केले. तसेच आधुनिक युगात लागू होणारी विज्ञान चालीसा विद्यार्थ्यांनी सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या क्रमाचे सूत्रसंचालन पूजा जाधव व जान्हवी वरे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन राधिका जाधव हिने केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रभारी उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, ज्येष्ठ शिक्षक सुनिल बुरड, रोहिणी आथरे, सचिन सिसोदिया, गोरख डघळे, शैलेश जैन तसेच सर्व विज्ञान शिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
Post a Comment
0 Comments