देवळाः विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित २०२४ साठी देवळा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक कैलास पवार व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस शांतांराम पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते सुधाकर पवार (आठवले गट) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांची विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव "अध्यक्ष पदी" निवड करण्यात आली व उपॶध्यक्ष रवि पवार खजिनदार विकी पवार व शांताराम पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी किशोर आहेर, चंदू मामा, सुनील पवार, शांताराम बच्छाव, सुधीर पवार, गोरख पवार, गणेश सोनवणे, राकेश पवार, राकेश अहिरे, राजू जगताप, पप्पू पवार, बंटी पवार, स्वप्नील पवार, तुषार पवार, सोनुभाऊ यांचेसह देवळा शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments