उपसंपादक : संजय जाधव, चांदवड
तालुक्यातील वडनेर भैरव पंचक्रोशीतील जवळपास १८ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची परभणी येथील नर्सापूर येथील व्यापाऱ्याने ६२ लाख तीन हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे लवकरात लवकर काढून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, भुसे यांनी पोलिस अधीक्षकांना संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ देण्याच्या सूचना केल्या आहेत.
वडनेर भैरव पंचक्रोशीतील जवळपास १८ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे बोकर्णी - नर्सापूर (सेलू) येथील व्यापारी महादेव बाबासाहेब गडदे याने ३० ते ३५ रुपये दराने जवळपास २,२०० क्विंटल द्राक्ष खरेदी केले होते. द्राक्ष खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याने पलायन केले.
हवालदील झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विकास भुजाडे, सहसंपर्क प्रमुख फौजी नाना घुले, नाना सलादे, गौरव सलादे यांच्या मार्गदर्शना खाली वडनेर भैरव पंचकोशीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना एक रुपयादेखील मिळाला नाही. एक ते दीड महिना उलटूनही संबंधित व्यापाऱ्याने पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत घेतली पालकमंत्री दादा भुसे यांची भेट. फसवणूक झालेले शेतकरी
भारत साळुंके (६ लाख ६९ हजार), सचिन निफाडे (३ लाख १२ हजार), अशोक जाधव (५ लाख ५० हजार), रामदास सलादे (८१ हजार), गौतम साळुंखे (४ लाख), नीलेश वक्ते (८ लाख), सुनील साळुंखे (४५ हजार), संतोष यळवंडे (२ लाख ९६ हजार), अनिल सलादे (१ लाख ९६ हजार), राजू चव्हाण (१ लाख ८६ हजार), शरद वक्ते (४ लाख ४५ हजार), संजय चव्हाण (३ लाख), मधुकर पगार (३ लाख ३० हजार), बाबाजी पगार (१ लाख ५० हजार), शरद बर्डे (३ लाख ५० हजार), राजेंद्र चव्हाण (३ लाख), अजय शिंदे (९३ हजार), भरत शिंदे (७ लाख).
300 शेतकऱ्यांनी वडनेर भैरव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर शेतकऱ्यांना वडनेर भैरव पोलीस स्टेशन मदत करावी यासाठी दादा भुसे यांनी वरिष्ठांना सूचना दिलेल्या आहेत
Post a Comment
0 Comments