Type Here to Get Search Results !

गुटख्याची तस्करी करणारा आतरराष्ट्रीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोरमधुन जेरबंद.स्थानिक गुन्हे शाखेची अभिमानास्पद दमदार कामगिरी

संपादक : सुनिलआण्णा सोनवणे
इगतपुरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मुंबई आग्रा हायवे मार्गने मुंबई कडे जाणारा गुटखा कंटेनर पकडून सुमारे एकविस लाखाचा अवैध गुटखा जप्त केला होता. या बाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवि 328, 272 ,273 ,188, 34   प्रमाणे दाखल आहे या गुन्ह्यात आरोपी  अमृत भगवान सिंह (रा.वडवेली पो. हिनोतिया ता खिलचीपुर जिल्हा राजगड मध्येप्रदेश).,पुनमचंद होबा चौहाण (रा.साकरगाव ता बिकण गाव जिल्हा खरगोण मध्येप्रदेश) यांना आटक करणात आली होती आरोपीकडे या तीन नमुद गुन्ह्याचा चौकशी केला असता गुटखाचा साठवणुक करून महाराष्ट्रात तसकरी करणारा मुख्य गुन्हेगार इसारर मन्सुरी मुस्ताक मन्सुरी (राहाणार इदौर) यांचे नाव निष्पन झाले होते. महाराष्ट्र राज्यात नजिकच्या राज्यातुन ग़ुटखाची मोठ्या प्रमाणात तस्करी मुख्य सुत्रधार इसारर मन्सुरी करणारया या व्यक्तीचा नासिक ग्रामिण पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखाचे पथक इदौर मध्ये प्रदेश येथे तपास करण्यत आले होते त्या प्रमाणे पोलीस पथकाने इदौर शहरातील राहुन परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटरवा माफिया इसारर मन्सुरी (वय 35 राहाणार श्रमिक कॉलणी राऊ मध्ये प्रदेश) यास शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीला ताब्यात घेऊन इगलपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात अटक करण्यत आली आसून न्यायालयाने त्याला 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी  दिली आहे. या गुन्ह्याचा तपास इगतपुरी पोलीस  ठाणे कडील अधिकारी व अंमलदार करित आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीसअधीक्षक 
नासिक ग्रामिण आदित्य  मिरखेलकर यांच्या मार्गदर्शना खाली स्थमिक गुन्हे शाखेचे पोलिस पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरिक्षक संदिप पाटील, हवालदार संवस्तकर, पोलीस नाईक योगेश कोळी, गिरिष बागुल, हेमत गिलबिले, प्रदिप बहिरम इगतपुरीचे उप पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, योगेश भावनाथ, पोलीस हवालदार प्रकाश कासार यांच्या पथकाने गुटखा माफिया इसारर मन्सुरी यास अटक केली आहे
आरोपी इसारर मन्सुरी हा इंदौर मध्येप्रदेश येथे गुटख्याची साठवनुक करून बंद कंटेनर मध्ये गुटखा लपवून गुटख्याची विविध राज्यांमध्ये चोरटी तस्करी करित होता. हा गुटखा माफिया पोलीसाच्या नजरेआड अनेक दिवसापासून तस्करी होता. त्यास अटक केल्याने राज्यातील अवैध गुटखा नेटवर्कची पाळेमुळे  खोदण्यात पोलीसाना यश आले.

Post a Comment

0 Comments