Type Here to Get Search Results !

चांदवड येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सज्ज रहा - श्री श्रीराम शेटे

संपादक : सुनिलआण्णा सोनवणे
 चांदवड : दिंडोरी लोकसभा विकास आघाडीची बैठक चांदवड येथील रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविकास आघाडीचे प्रमुख श्रीरामजी शेटे होते त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात आपल्याला महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवायची आहे तरी सर्व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते शेतकरी या सर्वांनी एकमताने महाविकास आघाडीचा जो ही उमेदवार दिला जाईल त्यास प्रचंड मतांनी निवडून आणायचे आहे, "निष्ठेची घेऊनी मशाल हाती ,वाजवू महाराष्ट्र अस्मितेची विजयाची तुतारी " ज्यावेळेस शिवाजी महाराज गड सर करायला जायचे त्यावेळेस शिवाजी महाराज तुतारी वाजवून पुढे जायचे तरी तुतारी हे विजयाचे प्रतीक आहे असे मत जयंत दिंडे व कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्यक्त केले. शिरीषभाऊ कोतवाल यांनी सांगितले की ह्या वेळेस महाविकास आघाडी तर्फे कोणताही उमेदवार असल्यास आपण सर्वांनी प्रचंड मतानी निवडून आणायचे आहे "अभि नही तो कभी नही " या म्हणीनुसार भाऊ यांनी उद्गार काढले. यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख श्रीरामजी शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितीन दादा आहेर, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय जाधव, शिवसेना तालुका अध्यक्ष विलास भवर ,भीमराव जेजुरे, राहूल कबाडे आदींची भाषणे झाली.
यावेळी इच्छुक उमेदवार भास्करराव भगरे, दिलीपराव वाघ ,चिंतामण गावित ,भालचंद्र बहिरम ,कैलास शार्दुल उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे ,शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या भारतीताई जाधव, खंडेराव आहेर ,विजय जाधव, अमोल भालेराव, प्रकाश शेळके, दत्ता वाघचौरे, शैलेश ठाकरे ,टोपे सर, अनिल पाटील , मतीन घासी, उत्तमराव ठोंबरे, प्रसाद प्रजापत ,विक्रम जगताप ,अशोक शिंदे, अशोक गायकवाड, संदीप शिंदे, शाम हिरे, संपतराव वक्ते, विकी जाधव, शिवाजी कासव, शंभू खैरे, धिरज संकलेचाआदी महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments