गेल्या ११ वर्षापासून अंबड नासिक या ठिकाणी सुरु असलेल्या सोलर कृषी मोटर पंप इत्यादी उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीचे नविन ठिकाणी ग्रामीण भागात चांदवड तालुक्यातील खेलदरी येथे डेलाईट सोलर कंपनीचे संचालक अमोल शंकर जाधव आणि रवींद्र भाऊसाहेब निकम यांनी सोलर हिटर व सोलर मोटर पंप यांचे उत्पादन सुरु केले असून शहराकडून मार्गक्रमण करून ग्रामीण भागात सदरची कंपनी सुरू केल्याने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून सदर कंपनीचे उदघाटन नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार सुधीरजी तांबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीनदादा आहेर, मराठा विद्या प्रसारक संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय जाधव, सरपंच परिषदेचे योगेश पाटील यांनी सोलर कंपनीच्या उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करून संचालकांना शुभेच्छा दिल्या.
सदर उदघाटन प्रसंगी शेलुचे प्रगतीशील शेतकरी शंकर जाधव, दिलीपराव मोरे, किसान ॲटोमोबाईल्सचे संचालक शांताराम घुले, प्रकाश महाले, विजय जाधव, राहुल पाटील नगरसेवक, बाळासाहेब माळी ज्ञानेश्वर काळे समाधान जामदार यांचे सह चांदवड देवळा सटाणा दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतकरी वर्ग व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments