चांदवड : येथे 'नमो' चषक अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
आज रेणुका लॉन्स, चांदवड येथे
आमदार डॉराहुल दादा आहेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
चांदवड मतदार संघात झालेल्या स्पर्धेत शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसह पुरुष, महिला अश्या एकूण चार ते पाच हजार स्पर्धकांनी सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजप अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, श्री.वाल्मिक पवार, श्री.योगेश ढोमसे, श्री.विजय धाकराव, श्री.मुकेश आहेर, श्री.मोहन शर्मा, श्री.सुनील शेलार, श्री.निंबाळकर सर यांच्यासह मुकेश आहेर, राहुल हंडगे, अण्णासाहेब शिंदे, डॉ.नितीन गांगुर्डे, बाजीराव वानखेडे, अमर मापारी, विठ्ठल आवारे, डॉ.भावराव देवरे, कल्याणी कुलकर्णी, सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आर.एस.पाटील सर सूत्रसंचालन केले.
मुख्य पाच किलोमीटर मॅरेथॉन पुरुषामध्ये सौरभ बाळू देवढे, नितीन शिंदे, जनार्दन जाधव तसेच महिलांमध्ये वैष्णवी आहेर, सपना आवारे व अपेक्षा आहेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला तसेच मनो चषक २०२४ मध्ये मॅरेथॉन, क्रिकेट(मोठा-छोटा गट), कब्बडी, खो-खो, चित्रकला, रांगोळी, बुद्धिबळ, धावणे२०० मी.४०० मी., रस्सीखेच, नृत्य, गायन, हॉलीबॉल, वक्तृत्व व कुस्ती अश्या एकूण १६ स्पर्धा विविध गटात घेण्यात आल्या या सर्व स्पर्धांचे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण संपन्न झाले.
सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
यावेळी दत्ता ठाकरे सर, विसपुते सर, चांदवडकर सर, पाटील सर, राधेश्याम चव्हाण, आर.एस.पाटील सर, निकुंभ सर, विशाल जाधव, संगीता बिरारी, काशिनाथ अहिरे, ठोंबरे सर, दळवी सर, माळी मॅडम, काळे सर यावेळी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments