चांदवड तालुक्यात घेण्यात आलेल्या नमो चषक विविध स्पर्धांमध्ये श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. बुद्धिबळ लहान गटात ओम ठाकरे ,प्रज्वल पवार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन लाभले.लहान गटात समूहगायन स्पर्धेत विद्यालयाच्या चमूने प्रथम क्रमांक मिळविला तसेच मोठ्या गटात समूहगायन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. सामूहिक नृत्य लहान गटात जोगवा या नृत्याने द्वितीय क्रमांक मिळविला. यासाठी विद्यालयाच्या संगीतशिक्षिका रुपाली कोतवाल, सविता दिवटे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. चांदवड- देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे, विद्यार्थी ,मार्गदर्शक शिक्षकांना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड ,सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे, पर्यवेक्षक प्रकाश आहेर, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments