Type Here to Get Search Results !

दुगांव ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

संपादकीय :
 दुगांव, चांदवडः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दुगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सरपंच संजय सोनवणे, उपसरपंच अलकाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नवल सोनवणे, पप्पू सोनवणे , वैशालीताई क्षिरसागर, वैशालीताई सोनवणे, पोलीस पाटील बाळू पाटील व गावातील सन्माननीय ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते
सदर शिवजयंतीच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील नागरिकांसाठी ज्या दोन ठिकाणी बोअरवेल घेतले आहेत त्या बोअरवेल मधून पाणी काढण्याचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला,. संपूर्ण तालुका पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेला असताना दुगाव ग्रामपंचायत ने आपल्या नागरिकांसाठी दोन बोरवेल ची व्यवस्था करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात का होईना मिटवला असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments