दैनिक आवाज: सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड:* मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मविप्र सांस्कृतिक महोत्सव सन 2023 -24 मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाने आलेल्या संघांना नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रांगणातील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये जिल्ह्यातील संघाचा कार्यक्रम घेण्यात आला यात श्रीमती जे. आर गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवडने जिल्हास्तरावर समूहनृत्यात द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला. यशस्वी संघाला संगीत शिक्षिका रूपाली कोतवाल, रूपाली काकळीज यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड , सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे ,पर्यवेक्षक प्रकाश आहेर सर्व शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments