Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने चांदवड मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह हे मा. मुख्यमंत्री एकनाथजीशिंदे साहेब यांची असून हिंदुत्वाचे खरे वारसदार असल्याचे शिक्कामोर्तब करणारा निकाल दिला. निकालानंतर चांदवड शहर शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. प्रथम नगरपरिषदे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच बाजार तळ व शिवसेना संपर्क कार्यालय येथे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व कार्यकर्त्यांना मिठाई वाटप करण्यात आले याप्रसंगी शिवसेना नेते श्री संदीप तात्या उगले उपतालुकाप्रमुख निलेश ढगे, दत्ता आबा गांगुर्डे शहर प्रमुख मुकेश कोतवाल उपशहर प्रमुख निखिल राऊत मंजीत कटारिया वैद्यकीयकक्ष तालुका प्रमुख दीपक शिरसाट वैद्यकीयकक्ष उपतालुकाप्रमुख मयूर राऊत शहर संघटक सुरेश बागुल शहर समन्वयक बाळा राजगिरे बाळासाहेब वाघ कुणाल ठोंबरे फैजल शेख प्रदीप सोनवणे बापू आहिरराव संदीप चव्हाण कैलास शेळके देवा बागुल गणेश जगताप आधी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments