Type Here to Get Search Results !

डॉक्टर साहेब वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

हुरहुन्नरी रोखठोक डॉ. सयाजी गायकवाड..
        शुभेच्छुक:-🚩🚩🎉🎉🎉🎉
                    रोनक आप्पा कबाडे
चांदवड तालुका म्हटला की पूर्वीचे दुष्काळाचे चित्र, पाचवीला पुजलेले पाण्याचे दुर्भिक्ष  ,केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे कांदा शेती उत्पन्न म्हणजे कायम आतबट्याचा खेळ. काळानुसार बदल स्वीकारत गावागावामधून नाशिक शहरात स्थायिक झालेले कोरडवाहू शेतकऱ्याची तरूण पिढी प्रतिकुल परिस्थितीमुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा मुलमंत्र जपत शिक्षणाचे ध्येय गाठत  नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून स्थिरस्थावर होत आहे. या सर्व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या गंगेत आणणारे चांदवडचे अर्थ्यवू मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी सभापती स्वर्गीय डॉ. ना.का. गायकवाड यांचा उल्लेख न झाल्यास आपण चांदवडच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विकासात अन्याय करतो आहे याचे शल्य निश्चीत राहील.
60 च्या दशकात डॉ. ना.का. गायकवाड हे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने नाशिक शहरात स्थिर स्थावर झाले ते ‌‘तात्या‌’ या नावाने. तात्या म्हणजेच दिवंगत डॉ. ना.का. गायकवाड अत्यंत मित्तभाषी, आपल्या वैद्यकीय व्यवसायाशी प्रामाणिक, वैद्यकीय व्यवसायात कामकाज करत असतांना आपण ज्या समाजातून व ग्रामीण भागातून आलो त्याची जाणीव तात्यांना होती त्यामुळे त्यांच्या क्लिनिकमध्ये कित्येक रूग्णाना मोफत सेवा देण्यात त्यांनी समाधान मानले. त्यांच्या परोपकारी वृत्तीमुळे बाहेरगावच्या कित्येक रुग्णांना तात्या स्वत:च्या खिशातुन परतीच्या प्रवासासाठी भाड्यासाठी पैसे द्यायचे हे जुन्या पिढीच्या जाणकारांना माहित आहे.
सामाजिक आणि विशेषत: शैक्षणिक क्षेत्रापूरता विचार केल्यास आणि त्यातही ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून विखरलेल्या गोरगरीब, अशिक्षित आणि दुर्बल घटकांतील आबालवृद्ध स्त्री पुरूषांच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी ‌‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय‌’ या ध्येय धोरणाने कार्य करणाऱ्या समाजधुरीणामध्ये स्वर्गीय डॉ. ना.का. गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रामुख्याने चांदवड तालुक्याच्या विकासासाठीचे त्याचे योगदान वादातीत आहे. त्याचा समर्थ वारसा गेल्या दोन दशकापासून त्यांचे सुपुत्र डॉ. सयाजीराव गायकवाड समर्थपणे सांभाळात आहे. डॉ. सयाजी म्हणजे प्रचंड दांडगा लोकसंपर्क असलेल्या लोकमान्यता असलेला मविप्र संस्थेतील एक कार्यक्षम संचालक.
सुरवातीच्या काळात दिवंगत डॉ. वसंतराव पवारांच्या शुभआशिर्वादाने व कार्यशैलीने शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण केले. मविप्र या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेत चांदवड तालुका संचालक, पुणे विद्यापीठ सिनेट मेंबर जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते पुन्हा मविप्र संचालक व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हा प्रवास त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक संबधाचे एक आगळ वेगळ उदाहरण म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रदिप ते डॉ. सयाजी गायकवाड हा त्याचा समाजजीवनातील प्रवास वाखण्याजोगा आहे.
मा. शरद पवारांचा पुरोगामी विचारांना जपतांना त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा राजकारणातील नफ्या तोट्याचे गणित न बघता मा. पवार साहेबांची खंबीर साथ सोडली नाही त्याचीच पावती म्हणजे 2019 च्या नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कुणालाही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण न करता कॅबीनेट मंत्री छगन भुजबळांनी त्यांची वर्णी लावली होती ती फक्त राष्ट्रवादी पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या धोरणामुळे व सातत्य असलेला शेतकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा कार्यकर्ता
डॉ. सयाजी म्हणजे शैक्षणिक शिस्तीचा भोक्ता, तालुक्यातील प्रत्येक शाळेचा व तेथे कार्यरत असलेल्या सेवकांचा 7/12 व कुंडली त्याच्या समवेत असते, अत्यंत स्पष्ट बोलणारा, कार्यकर्त्यामध्ये रमणारा मग सकाळी सकाळी चांदवडला एखाद्या अत्यंविधी असो, दशक्रीया असो किंबहुना लग्न किंवा धार्मिक कार्यक्रम डॉक्टरांची हजेरी निश्चित. बारा बारा तास आपल्या कामात मग्न. थोडेसे तोंडी बोली फटकळ, राजकारणात आवश्यक असलेले आर्थिक व सामाजिक गणित अलगदपणे जुळ विण्यात माहीर व्यक्तिमत्व, परंतु सर्व काही अजाणतेपणे, कमांडींग व्यक्तिमत्व, स्वभावाने फटकळ  , आपल्या मर्यादांची जाणीव असणारा निव्यर्सनी, अडचणीच्या व माहिती नसलेल्या ठिकाणी अबोल राहणे हा स्थायीभाव. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात मित्रांचे सहकार्य व त्यांच्या अभ्यासू अर्धांगिनी डॉ. विजया  मोगल ( गायकवाड ) यांची प्रतिकुल परिस्थितीत ही मोलाची साथ ही त्यांची जमेची बाजु नाकारून चालणार नाही. कारण त्यांची उच्चशिक्षित मुलं ही त्यांच्या आयुष्याची शिदोरी हे अनेकांना ज्ञात आहेच.
मविप्र संस्थेतील सेवकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता राहावी म्हणून नेहमी कार्यरत कुठलीही मुलाहिजा न ठेवता संस्थेतील एकमेव संचालक जो संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयामध्ये सरप्राईज भेटी देऊन बेशिस्त सेवकांवर शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातील रूग्णांना सर्व प्रकारचे मदत व सहकार्य त्याचे लाभते. ‌‘कुणी निंदा अथवा वंदा‌’ लोकांमध्ये रममान होणे हाच आमचा धंदा हा त्यांचा कटाक्ष परंतु सामान्य जणाच्या सुख दु:खात अधिक रममाण होणाऱ्या या लोकसेवकाला किंबहुना भावी लोकप्रतिनिधीला देवळा-चांदवडकरांनी भरभरून प्रतिसाद मतरुपी दान देण्याची आवश्यकता आहे. कारण लोकसंपर्क, राजकारणात आवश्यक असलेली राहणीमान कोणत्याही प्रकारचा डामडौल पासून दूर राहणे नेहमीच पसंत labourous job म्हणजेच अहोरात्र काम हेच व्रत समजून आपल्याच धुंदीत आयुष्य जगणाऱ्या डॉक्टरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

0 Comments