जिल्हा प्रतिनिधी/उप संपादक:- संजय जाधव
*राष्ट्रीय पक्षी मोरास जीवदान*
देव तारी त्याला कोण मारी या आशयाचा प्रत्यय चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील बजरंग नगर मोरे वस्तीत श्री.बापू भिकाजी मोरे यांच्या गट नंबर 505 या 50 फूट खोल विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडला होता या प्रकारची माहिती सकाळी साडेआठच्या सुमारास इंडियन आर्मी जवान केशव बापू मोरे हे सकाळी विहिरी वरती साडेआठच्या सुमारास सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांनी सहज विहिरीमध्ये डोकावुन पाहिले असता मोर पडलेला आढळून आला ही माहिती आर्मी केशव मोरे यांनी प्राणी मित्र समाजसेवक श्री भागवत झाल्टे यांना दिली त्यांनी वनपरिक्षेत्र येवला येथील श्री अक्षय म्हात्रे साहेब यांना दिली त्यांनी त्वरित ही माहिती वनरक्षक सोनाली वाघ यांना दिली त्यामुळे लगेचच तेथे वन कर्मचारी प्राचारन करण्यात आले
वनकर्मचारी भाऊसाहेब झाल्टे व समाजसेवक भागवत झाल्टे यांनी या अगोदर आनेक ठिकाणी निस्वार्थी समाज सेवेचे काम करतात त्यांचा तालुक्यात व परिसरात मोठ्या जनसंपर्क आहे झाल्टे त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन मोराला काशिनाथ मोरे व झाल्टे कॅरेटच्या साह्याने विहिरीतून बाहेर सुरक्षित काढलं मोरे व्यवस्थित असल्याची खात्री करून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून जीवदान दिले
*उपस्थित ग्रामस्थ*
अनिल वाघचौरे कैलास वाकचौरे रावसाहेब मोरे माऊली वाकचौरे यांनी सर्वांनी मोर काढण्यास मदत केली.
याप्रसंगी भागवत झाल्टे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्या अभावी भटकंती करावी लागते प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी ही मागणी व्यक्त केली..
Post a Comment
0 Comments