चांदवड : वडाळीभोई येथील ॲड. बी. जी. ठाकरे माध्यमिक सेवक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद सोनवणे (सर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये उपाध्यक्षपदी सोमनाथ गांगुर्डे तर मानद चिटणीसपदी शरद न्याहारकर यांची निवड झाली.
निवड जाहीर झाल्यानंतर सोसायटीचे संचालक प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष शरद सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा मानस यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडणूक प्रसंगी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक शांताराम पाटील, आर. के. पवार, शिवाजी सोनवणे, शरद ठोंबरे, गोलवड सर, गीते सर, माळी सर, नरोटे सर यांच्यासह सर्व संचालक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुक्यातून नूतन कार्यकारिणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments