Type Here to Get Search Results !

राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी .... नरेंद महाराज ​संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
​चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या.
अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
​           _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ 
राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
​जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.

Post a Comment

0 Comments