Type Here to Get Search Results !

चांदवडच्या 'बालतरंग'मध्ये घुमली शिवगर्जना.... चिमुकल्यांच्या रूपात अवतरला स्वराज्याचा इतिहास!

सदगुरु रक्षा न्युजः सुनिलआण्णा सोनवणे
चांदवड: सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून येणारा गारवा आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने आज बालतरंग इंग्लिश स्कूल, चांदवडचा परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला. निमित्त होते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे. अतिशय भावूक आणि प्रेरणादायी अशा या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
​​कार्यक्रमाचे सर्वात हृदयस्पर्शी दृश्य म्हणजे शाळेतील चिमुकल्यांनी केलेली वेशभूषा. कोणी हातात तलवार घेऊन 'प्रौढ प्रताप पुरंदर' म्हणणारा बाल शिवबा झाला होता, तर कोणी संस्कारांची शिदोरी देणारी राजमाता जिजाऊ! या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून प्रत्यक्ष इतिहासच चांदवडच्या भूमीत अवतरल्याचा भास होत होता.
​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शीतल मॅम आणि गायत्री मॅम यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. केवळ कार्यक्रम न करता मुलांच्या मनात महाराजांचे विचार रुजावेत, या हेतूने त्यांनी केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले.
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. परेश शिरसाठ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी शिवरायांच्या नीतिमत्तेचे आणि शौर्याचे पदर उलगडून दाखवले. "मुलांच्या या वेशभूषेमागे केवळ देखावा नाही, तर त्यांच्यात शिवरायांचे गुण रुजवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे," असे भावोद्गार यावेळी काढण्यात आले.
पोवाडे आणि घोषणांनी शालेय परिसर दुमदुमला.जिजामाता आणि शिवरायांच्या रूपातील मुलांनी पालकांचे मन जिंकले.​परेश शिरसाठ सरांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिव-विचारांची पेरणी केली.

Post a Comment

0 Comments