चांदवड : येथील श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड 'खरी कमाई' उपक्रमांतर्गत 'आनंद मेळावा' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे एस. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश शेळके होते. प्रमुख अतिथी म्हणून शालेय समितीचे सदस्य विजय कोतवाल, अशोक व्यवहारे, डॉ. भालचंद्र पवार, सुनीलअण्णा सोनवणे, एच. के. ठाकरे, सी. पी. जाधव आणि अनिल कोतवाल उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे सर्व सदस्य, पालक व माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.मार्गदर्शन आणि प्रास्ताविक प्राचार्य लोहकरे एस. एन. यांनी आपल्या प्रास्ताविकात स्काऊट गाईड चळवळीचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात प्रकाश शेळके यांनी विद्यार्थ्यांना 'खरी कमाई' या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगतानाच जीवनात कष्टाचे महत्त्व किती आहे, यावर अनमोल मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व सदस्यांनी व उपस्थितांनी स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाककलेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा परिचय सर्वांना झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ठाकरे एन. के. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परदेशी आर. के. आणि गायकवाड आर. के. यांनी विशेष परिश्रम घेतले. फलक लेखनाचे काम पाटील एस. एन. यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार श्रीमती एम. एस. ठाकरे यांनी मानले.
Post a Comment
0 Comments