Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयात बालिका दिवस उत्साहात साजरा.....

 सदगुरू रक्षा न्युज : चांदवड प्रतिनिधी
चांदवड:-  श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
श्री नेमिनाथ जैन विद्यालयात भारताच्या प्रथम शिक्षिका,  मुख्याध्यापिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले. 
त्या निमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षिकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, उपशिक्षक मनोज उपाध्ये यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपशिक्षक मनोज खिवंसरा यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन एन.सी.सी. विभाग प्रमुख राजेश चव्हाण, संदिप दराडे, गोरख डघळे, तुषार पाटील, भाग्यश्री निकम यांनी केले.

Post a Comment

0 Comments