Type Here to Get Search Results !

संदीप चव्हाण यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता ........शांताराम ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश ....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवडः हिरापूर दरसवाडी येथे गेल्या चार दिवसापासून संदीप चव्हाण यांनी परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी याकरिता आमरण उपोषण सुरू केले होते. शांताराम ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन उपोषणाचे मुद्दे व बाबी समजून घेऊन,प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यामध्ये यशस्वी संवाद घडवून आणला त्या संवादातून हिरापूर ग्रामपंचायत हद्दीत एकूण 900 खातेदार असून त्यापैकी 815 खातेदारांचे शासन नियमाप्रमाणे पंचनामे करून त्यापैकी 405 शेतकरी खातेदार यांना पिक नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली. उर्वरित खातेदारांपैकी 365 खातेदारांचे पंचनामे पूर्ण करून यादी तहसीलदार साहेब यांना देण्यात आली. त्या सर्व खातेदारांची नुकसान भरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती  प्रशासन वर्ग करणार आहे व 45 खातेदार यांचे पंचनामा पूर्ण झाले असून त्यांचा आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक यांची यादी तयार करून सोमवार पर्यंत तहसीलदार साहेब यांना देण्यात येणार आहे. व तीही नुकसान भरपाईची रक्कम पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे.अशी चर्चा झाली व त्या संदर्भातील कागदपत्र हिरापूर गावातील ग्रामस्थांच्या समोर उपोषण करते संदीप चव्हाण यांना शासन प्रतिनिधी श्री जगताप तात्या यांनी सुपूर्द केली व या सर्व बाबींमुळे संदीप चव्हाण व हिरापूर ग्रामस्थ यांचे समाधान झाल्याने ग्रामस्थांच्या होकारानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. जवळपास 39 लाख इतकी भरीव मदत हिरापूर परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.याबद्दल ग्रामस्थ व उपोषणकर्ते यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments