चांदवड : रोहीदास नगर येथे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री राहुल दादा आहेर यांच्या शुभ हस्ते रोहिदास नगर मध्ये सामाजिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना आमदार आहेर यांनी चांदवड तालुक्यात चर्मकार समाज मोठ्या प्रमाणात असून तालुकास्तरावर त्यांच्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम व कार्यक्रम घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे होते आणि त्या दृष्टीनेच सामाजिक सभागृह काम मंजूर करण्यात आलेली आहे. यामुळे समाजातील सर्व कुटुंबांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळालेले आहे. यापुढे या ठिकाणी अजून अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन याप्रसंगी आमदारांनी दिले.
चांदवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री भूषण भैय्या कासलीवाल यांनी मनोगत व्यक्त करताना रोहिदास नगर मध्ये सामाजिक सुविधा बरोबरच काँक्रीट रस्ते,आधुनिक जिम व व्यायाम शाळा, पेवर ब्लॉक, सार्वजनिक स्वच्छतागृह इत्यादी सुविधा चांदवड नगरपरिषदे च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी चांदवड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य चर्मकार संघाचे पदाधिकारी तसेच चांदवड येथील मान्यवर मनोज शिंदे (तालुकाध्यक्ष- भाजप) अशोककाका व्यवहारे , अशोककाका भोसले, बाळासाहेब वाघ, जैन सर, शैलेशजी सोनवणे (उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष- राष्ट्रीय चर्मकार महासंघ)
प्रदीपजी अहिरेसर ( जिल्हाध्यक्ष- राष्ट्रीय चर्मकार महासंघ) मोहनजी शर्मा , भाऊसाहेब पठाडे , महेश खंदारे, सुनिल डूंगरवाल, आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्र संचालन- बाळासाहेब धाकराव( सर ) यांनी केले
कार्यक्रमाचे आयोजन विजयभाऊ धाकराव ,मनोहर अहिरे , गोपी बडोदे, जयेश पारवे आदींसह समाज बांधवांनी केले
या कार्यक्रमासाठी संतोष बडोदे, जयेश पारवे, रोहिदास बडोदे, भुषण बडोदे, सोमनाथ बडोदे, सुधिर पारवे, उमेश बडोदे आदींनी परिश्रम घेतले
तर या कार्यक्रमासाठी प्रभाकर घोलप, संजय अहिरे, विट्ठल घोलप,सुनिल बडोदे, मोतीलाल बडोदे,बलवीर बडोदे,बंटी पारवे,हरिसिंग परदेशी,प्रकाश पारवे, रणजित बडोदे, चंदू पारवे, पवन बडोदे,अक्षय बडोदेआदिंसह समाज बांधव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments