चांदवडः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त चांदवड नगर परिषदेला नमो उद्यान उभारण्यासाठी एक कोटी निधी मंजूर झाल्याचे माहिती जिल्हा संघटक संदीप तात्या उगले मा, उपनगराध्यक्ष कविताताई संदीप उगले यांनी दिली त्या म्हणाल्या की चांदवड नगरपरिषदेच्या तर्फे उद्यान उभारणीच्या कार्याला लवकरच सुरुवात होणार असून उद्यानासाठीच्या आरक्षित जागांमध्ये उत्कृष्ट उद्यान विकसित करून नागरिकांना चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने चांदवड नगर परिषदेसाठी एक कोटी रुपयांच्या निधी उद्यान विकसित करण्यासाठी दिला आहे हा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकासासाठी दिला आहे याबाबत शासन निर्णय बुधवार दिनांक 17 तारीख रोजी निघाला असून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील नगरपरिषद ला कामासाठी विशेष अनुदान म्हणून हा निधी दिला जातो नगरपरिषद स्तरावरती शहरातील उद्यानाची देखभाल दुरुस्ती तसेच नव्याने विकसित करण्याकरता निधीची उपलब्धता सुलभ व्हावी यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायत यांना हा निधी उपलब्ध करून दिला आहे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्यासाठी हा निधी दिला असून विकसित केलेल्या उद्यानांची विभाग वाढ स्पर्धा घेण्याचे शासनाने ठरवलेले आहे या स्पर्धेतून प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत तीन उद्यानांची निवड होणार आहे प्रथम आलेल्या नमो उद्यानाचा मान मिळवणाऱ्या नगरपरिषदेस पाच कोटींचा निधी तर दुसरा आणि तिसरा नंबर मिळवणाऱ्या नगरपरिषदेस अनुक्रमे तीन आणि दोन कोटींचा निधी दिला जाणार आहे
चांदवड नगरपरिषदेला नमो उदयान उभारण्यासाठी एक कोटींचा निधी
September 25, 2025
0
Tags
Post a Comment
0 Comments