Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला IPL चा थरार....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:-रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी वानखडे स्टेडियम मुंबई येथे आयोजित मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या IPL सामन्याचे अविस्मरणीय क्षण  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या विश्वस्त आणि प्रबंध समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि पदाधिकारी यांच्या विशेष प्रयत्नातून हा सामना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आला. विद्यालयातील 8 वी तील आणि 14 वर्ष वयोगट पूर्ण केलेले एकूण 41 विद्यार्थी आणि विद्यालयाचे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील आणि क्रीडा विभाग प्रमुख दत्ता ठाकरे असे 2 शिक्षक हे विद्यालयातर्फे मैदानात प्रत्यक्ष उपस्थित होते. 
सदर सहलीचे आयोजन निशुल्क पद्धतीने करण्यात आलेले होते व यासाठी आलेला सर्व खर्च रिलायन्स फाउंडेशन द्वारा करण्यात आलेला होता. 
क्रिकेटचा सामना विद्यार्थ्यांना मैदानावर प्रत्यक्षपणे अनुभवता यावा यासाठी  भारती फाउंडेशन नासिक व अविनाशजी गोठी, व्यंकटेश नगर टीम तसेच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने यशस्वी आयोजन व नियोजन करण्यात आले.
संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी मनःपूर्वक कौतुक केले. 
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या सहलीत सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्था आणि विद्यालयाबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्र राज जैन आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments