Type Here to Get Search Results !

नाशिक जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुली संदर्भात कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा दत्तकृपा लॉन्स वलखेड फाटा ता. दिंडोरी येथे संपन्न

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवते
नाशिक / दिंडोरी :  जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुली संदर्भात कर्जदार शेतकऱ्यांचा मेळावा दत्तकृपा लॉन्स वलखेड फाटा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे रविवार दिनांक 27 4 2025 रोजी संपन्न झाला मेळाव्यात मोठ्या संख्येने कर्जदार शेतकरी उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते प्रकाश शिंदे हे होते मेळाव्याचे प्रास्ताविक अभय सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन गोकुळ वडजे यांनी केले  मेळाव्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मेळाव्यामध्ये खालील ठराव मंजूर करण्यात आले

 _रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी, दत्तकृपा लॉन्स, वलखेड फाटा ता. दिंडोरी येथे शेतकरी मेळाव्यात झालेले ठराव._ 

१) मयत कर्जदारांसाठी देण्यात आलेली सवलत ज्याने कर्ज घेतले तो मूळ कर्जदार मयत होऊन त्याची वारस जरी लागलेली असतील तरी देखील मूळ कर्जदार या नात्याने मयत कर्जदारास असलेली व्याजमाफीची सवलत सदर खात्यावरील वारसांना लागू करावी. 
२) ज्या कर्जदारांनी मागील ओटीएस मध्ये पैसे भरलेले असतील त्यांनी भरलेल्या रकमेचा विचार नवीन ओटीएस लागू झाल्यानंतर त्यामध्ये करण्यात यावा. 
३) ओटीएस साठी मुद्दल विचारात घेताना शेतकऱ्याने घेतलेली पुनर्गठन किंवा रूपांतरण किंवा दोन्ही यांच्यापूर्वीची मूळ रक्कम विचारात घेतली जावी. 
४) ट्रॅक्टर किंवा इतर शेती उपयोगी वाहन कर्ज यांचा विचार ओ टी एस मध्ये करताना पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज यांच्याप्रमाणे सवलतीस पात्र करण्यात यावा. 
५) नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांचे लेखा परीक्षण करण्यात यावे सदर लेखापरीक्षणाचा अहवाल संस्था पातळीवर प्रत्येक सभासदास मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात यावा.
६) येत्या एक ते दोन महिन्यात पूर्ण मुद्दल भरण्याची तयारी दाखविल्यास सदर कर्जदारांना व्याजात पूर्ण सूट देण्यात यावी. ज्या कर्जदारांची मुद्दलाचे समान हप्ते करून देण्याची मागणी असेल त्यांना तशी मुभा देण्यात यावी. 
७) कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबारावर बँक किंवा संस्थेची नावे लागली असतील ती ती रद्द करून मूळ मालकाचे नाव पूर्वीप्रमाणे लावण्यात यावे. 
८) कर्ज योजनेत कर्ज भरल्यानंतर भविष्यात शेतकऱ्याला कर्ज घेण्यास अडचणी येतील असा कुठल्याही प्रकारचा शेरा किंवा नोंद सातबारावर मागे ठेवण्यात येऊ नये.
९) कोरोना काळात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आश्वासनाला अनुसरून नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या सदर काळातील निधन झालेल्या कर्जदारांचे मुद्दल व्याजासह पूर्ण कर्ज माफ करण्यात यावं.
मेळाव्यास शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे कादवाचे जेष्ठ संचालक बाळासाहेब जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ उपाडे मोती नाना पाटील समन्वय समितीचे भगवान बोराडे कैलास बोरसे गंगाधर निकाडे विलास बोरस्ते हिंदू पाटील पगार दत्तात्रय पाटील शेळके सुरेश शिरसाट सोमनाथ मोकाट रघुनाथ जगताप रामनाथ टिकले भाऊसाहेब भंडारे माणिक उपाडे एकनाथ धनवटे बाळासाहेब बोरस्ते रमेश बोरस्ते जीवन मोरे अनिल वडजे संदीप भाऊ उगले गुलाब आहेर शांताराम शेळके शांताराम काळोखे जगन भुसाळ रघुनाथ पाटील विनोद आप्पा देशमुख पांडुरंग उखर्डे प्रशांत पाटील मनू पाटील गजानन खांदवे संदीप खांदवे जयराम मोरे सोपान संधान बाजीराव शिंदे बाळासाहेब कामाले ज्ञानेश्वर शिंदे त्र्यंबक शिंदे अर्जुन पाटील रमेश पाटील बाळासाहेब पाटील भास्कर वसाळ नवनाथ पाटील पंकज शिरसाट दिपक शेळके हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments