Type Here to Get Search Results !

श्री नेमिनाथ जैन विद्यालयाचे सी पी एस ऑलिंपियाड परीक्षेत सुयश....

सदगुरु रक्षा न्युज । चांदवड
चांदवड:- श्री नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या सी पी एस ओलिंपियाड स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादित केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
दिल्ली अंतर्गत दि.18 व 19 डिसेंबर 2024 रोजी गणित, इंग्रजी, विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांची ऑलिंपियाड परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेसाठी गणित विषयात 27, इंग्रजी विषयात 17, सामान्य ज्ञान विषयात 9 तर   विज्ञान विषयात 5 असे इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील एकूण ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत विद्यालयाला तीन गोल्ड, एक सिल्वर व एक ब्राँझ असे एकूण पाच मेडल प्राप्त झालेले आहेत. यामध्ये गणित विषयात कु.इलाक्षी देवरे हिला प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल प्राप्त झाले असून तिची सेकंड लेव्हल परीक्षेसाठी निवड झालेली आहे. तर कु.कपिश अग्रवाल याला गणित विषयात दुसऱ्या क्रमांकाचे गोल्ड मेडल प्राप्त झालेले आहे. सामान्य ज्ञान विषयात कु.यश पवार या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल प्राप्त झालेले आहे. तर गणित विषयामध्ये कु. हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्याला सिल्वर मेडल तर कु. वैष्णवी महाले हिला ब्रांझ मेडल प्राप्त झालेले आहे.
 गुणवंत विद्यार्थ्यांना उपप्राचार्य देवेंद्र राज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील, सी पी एस ओलंपियाड परीक्षा विभाग प्रमुख श्री गोरख डघळे, व संतोष मते,ज्येष्ठ शिक्षिका दुर्गा शाकद्वीपी, मंजुषा ओस्तवाल, गंगाधर खैरनार यांच्या हस्ते पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी विद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments