चांदवड . २३ तारुण्य अवस्था म्हटलं की, प्रत्येकाच्या वाट्याला नोकरीचा, लग्नाचा संघर्ष येतो. एकेकाळी मी देखील छोट्याश्या नोकरीसाठी मोठा संघर्ष केलाय. आज मंत्री असलो तरी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मात्र मिळेल ती संधी घेणं अन् आत्मविश्वासान, प्रामाणिकपणे प्रत्येक तरुणाने काम करायला हवं. शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच युवा सेनेचे अभिषेक चौधरी यांनी चांदवड सारख्या ग्रामीण भागात राबविलेला रोजगार मेळावा तरुणांना दिशा देईल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ते चांदवड येथे शिवसेना तसेच भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन च्या वतीने आयोजित महारोजगार मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून आज ता. २३ रविवारी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब चौधरी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय महाराज धोंडगे, कृउबा सभापती संजय जाधव, सुनील पाटील, राजेंद्र सोनवणे, भाऊलाल तांबडे, गिरीश लाड, विश्वासराव मोरे, देवा वाघ, फरहान खान, शांताराम ठाकरे, संदीप उगले, योगेश म्हस्के, नवनाथ निचित, निलेश ढगे, निलेश पाटील, राजाभाऊ पाटील, अस्मिता देशमाने, मंगला भास्कर, संगीता दवंगे, रोशनी कुंभार्डे आदी. मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नोकरी गरज, पात्रता अन् तारुण्यातील संघर्षावर आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले. मोबाईलच्या विळख्यातून तरुणाईने बाहेर पडायला हवं. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीची सुरुवात कुठल्याही नोकरी, छोट्या व्यवसायाने होते. हि सुरुवात प्रत्येकाने आत्मविश्वासाने करावी. राजकारण असो की नोकरी शॉर्ट कट मारून सर्वोत्तम काहीच मिळत नाही यासाठी संघर्ष च करावा लागतो असा कानमंत्र त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.
उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वात मोठा रोजगार मेळाव्यात ४४ राष्ट्रिय, अंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची संधी तरुणांना उपलब्ध करून दिली होती ज्यात १०२३ तरुणांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मेळाव्यास अडीच ते तीन हजार तरुणांनी उपस्थिती दर्शवली.विशेषतः या मेळाव्यास तरुणींनी मोठा सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच २५० तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या यातील ५० तरुणांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यानंतर दिवसभर आलेल्या तरुणांचे कागदपत्रे तपासणी, मुलाखती सुरू होत्या ज्यात ६८७ तरुणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. उर्वरित तरुणांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेनेचे अभिषेक चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक निकम, दीपक शिरसाठ, विनायक हांडगे, बाळासाहेब जाधव, बापू अहिरराव, निखिल राऊत, प्रदीप सोनवणे, कैलास शेळके, विनोद खैरे, देवेंद्र बागुल, रोहित ठाकरे, प्रतीक उगले, विशाल चौधरी, सुमित भालेराव, ईश्वर बेलदार, आकाश सानप, दीपक गचाले, अतुल गचाले , आकाश कुठे, ऋतिक तिडके, मुक्ता गुंजाळ, लीना महाले, भारती जाधव, सागर कानडे, मयूर राऊत आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचलन प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी तर आभार शांताराम ठाकरे यांनी मानले.
शिक्षणमंत्र्यांची भेट....
रयतेस पोटास लावावे.... हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थाने या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात आला. अशा शब्दात राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या रोजगार मेळाव्यास भेट देत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अभिषेक चौधरी यांचे विशेष कौतुक त्यांनी यावेळी केले. यासोबतच विजय करंजकर, विक्रम नागरे आदींनी भेट दिली.
*********++++++++******--------********
भाऊसाहेब चौधरींकडून अपेक्षा....
दरम्यान या मेळाव्यास उपस्थित विविध मान्यवरांनी चांदवड तालुक्यात MIDC व्हावी याकरिता भाऊसाहेब चौधरी यांना वेळोवेळी साकडे घातले आहे. याला उत्तर देताना MIDC साठी आपले युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगराज्यमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी यश येईल असा शब्द भाऊसाहेब चौधरी यांनी दिला.
********----************----------*****--*
चांदवड येथे शिवसेना तसेच भाऊसाहेब चौधरी फाउंडेशन यांच्या वतीने मेळाव्यात तरुणांना निवडीचे प्रमाणपत्र देताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, अभिषेक चौधरी, भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, शांताराम ठाकरे आदी.
Post a Comment
0 Comments