Type Here to Get Search Results !

श्रीमती जे.आर गुंजाळ विद्यालयात इयत्ता बारावी कला,विज्ञान विद्यार्थी निरोप समारंभ उत्साहात संपन्न

सदगुरू रक्षा न्युज चांदवड
चांदवड : श्रीमती जे.आर गुंजाळ विद्यालयात इयत्ता बारावी कला,विज्ञान विद्यार्थी निरोप समारंभ उत्साहात संपन्न
या कार्यक्रम प्रसंगी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री खंडेराव दादा आहेर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .तसेच या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ.श्री शैलेंद्र गायकवाड संमोहन तज्ञ उपस्थित होते. याप्रसंगी शालेय गीतमंचाने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत,स्वागत गीताने  केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री लोहकरे .एस .एन यांनी केले. विद्यार्थ्यांना निरोप देताना गरुड पक्षाप्रमाणे उंच आकाशात भरारी घ्यावी, उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे परीक्षा,सामाजिक बांधिलकी,आपल्या आयुष्याचे ध्येय आपणच ठरवा असे विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले. आजचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते श्री .शैलेंद्र गायकवाड सर यांचा परिचय प्रा.बच्छाव सरांनी करून दिला .यानंतर डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ,वास्तविकता ,जबाबदारी, आपल्या जीवनाचे ध्येय याविषयी सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले .

Post a Comment

0 Comments