चांदवड : वाहेगांव तालुका चांदवड येथील नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सत्कार स्वीकारताना सोबत टीव्ही मालिका फेम कुमारी सई मोराणकर व संस्थापक मंडळ.
वाहेगाव साळ ता. चांदवड येथे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल आझाद हिंद फेस्टिव्हल अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली,
यावेळी प्रमुख मान्यवर अनिल काळे (माजी सभापती,चांदवड), संजय जाधव (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड),डॉ. प्रतापराव पवार व डॉ. वैशालीताई पवार हे होते. विशेष अतिथी म्हणून कु. सई मोरांनकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
Post a Comment
0 Comments