चांदवड : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्राचार्य संजय लोहकरे सर व पर्यवेक्षक केदू गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट- गाईड आनंद मेळावा उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म. वि. प्र. समाज संस्थेचे सेवक संचालक जगन्नाथजी निंबाळकर सर होते.याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य लोहकरे सर,शालेय समितीचे अध्यक्ष खंडेराव आहेर, पर्यवेक्षक गरुड सर तसेच शालेय समितीचे इतर सदस्यही उपस्थित होते.
मेळाव्याच्या सुरूवातीला अध्यक्षांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते स्काऊट- गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . विद्यालयातील गीत मंचाने स्काऊट गाईड प्रार्थना व ध्वज गीताचे गायन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर काळे यांनी केले. त्यात त्यांनी मेळाव्याचा हेतू व खरी कमाईचे महत्त्व स्पष्ट केले.त्यानंतर सर्व मान्यवरांनी स्काऊट-गाईड शिबिराचे व आनंद मेळाव्यातील स्टॉलचे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाचे व स्टॉल मांडणीचे कौतुक केले. तसेच या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान कौशल्य विकसित होईल आणि त्यांची श्रमप्रतिष्ठा वाढेल,त्यांना कष्टांचे महत्त्व कळेल असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
आनंदमेळाव्यात विद्यार्थ्यांनी मिसळपाव ,वडापाव, ,पाणीपुरी, पाववाडा ,चना मसाला, , सँडविच, चहा- ,बिस्किट, इडली -डोसा, कचोरी,भेळ, पावभाजी, गुलाबजॅम,पेरु,समोसा,फिंगरचिप सोयाबिनचिली, बटाटा पोंगे, रसना, आदी स्टॉल लावले होते. या स्टॉलला आकर्षक नावे देऊन सजावट करण्यात आली होती. काही स्टाॅल मनोरंजनात्मक खेळांचे होते .त्यात ग्लास पाडणे, बादलीत चेंडू टाकणे, चेंडू फेकणे यासारखे फनी गेम होते. विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातील स्टॉल मधील वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि खेळांचा आनंदही लुटला. विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातून व्यवहार ज्ञानाचे नवीन अनुभव घेतले.
आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील स्काऊट-गाईड समिती तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक-शिक्षिका,कॉलेजचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
स्काऊट शिक्षक एन.के. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले तर आर.के. परदेशी यांनी आभार मानले
Post a Comment
0 Comments