सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड: जोधपुर निवासी तरुणजी बोरा यांचे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर सहकार्यांसाठीचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजन श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, विद्यालयाचे समन्वयक शांतीलालजी अलिझाड, संस्थेचे सह मानद सचिव झुंबरलालजी भंडारी, श्रीमती कंचनबाई संचेती श्रीमती किरण भाटिया, श्रीमती मंगलादेवीबाई बाफना, जे आर बाफना, विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
याप्रसंगी तरुणजी बोरा यांनी माणसाच्या जीवनात अनेक संकटे येत असतात परंतु त्याला न घाबरता आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट करू नये. तसेच आपण आयुष्यात नेहमी हसत राहिले पाहिजे. प्रत्येकाने निर्व्यसनी राहुल आनंदाने आयुष्य जगावे. तसेच आपल्या जीवनाचे ध्येय मानव कल्याण असावे असा महत्त्वपूर्ण संदेश देत उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका मंजुषा ओस्तवाल यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन शिल्पा चोरडिया यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment
0 Comments