Type Here to Get Search Results !

संविधानाच्या शिल्पाची परभणी येथे विटंबना झाल्याने देवळा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे निषेध व्यक्त ..........पोलीस स्टेशनला दिले निवेदन.

देवळा तालुका प्रतिनिधी : कैलास पवार
देवळा  परभणी येथील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करणारा इसामावर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई होण्याबाबत विनंतीपूर्वक निवेदन करतो की परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या शिल्पाची मनुवादी व्यक्तींनी विटंबना करून तोडफोड करण्यात आली असून सदर घटनेचा तीव्र निषेध करीत असून सदर इसामावर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मार्फत विनंती निवेदन देण्यात येत आहे यावेळी जिल्हा संघटक शांताराम पवार नगरसेवक कैलास पवार रिपाई देवळा तालुका अध्यक्ष कैलास पवार शहराध्यक्ष विकी पवार नगरसेवक दिलीप सयाजी आहेर नगरसेवक किरण आहेर कृष्णा पवार केशव पवार कपिल पवार राजू जगताप किरण गांगुर्डे शुभम पवार कल्पेश पवार नितीन आहेर यांच्यातर्फे पीआय साहेब यांना निवेदन देण्यात आले

Post a Comment

0 Comments