Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे तालुकास्तरीय म.वि.प्र. सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : चांदवड येथे श्रीमती जे आर गुंजाळ विद्यालयात आज मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने तालुकास्तरीय सांस्कृतीक महोत्सव कार्यकम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे उदघाटन मविप्रचे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर व प्राथमिक स्कुल कमेटीचे अध्यक्ष ॲड राजेंद्र ठाकरे यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन करून व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ८:30 वाजता करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले असून या स्पर्धकांमधुन विजयी झालेल्या अर्थात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या संघास जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडले जाणार आहेत. सदर स्पर्धेचे परिक्षक म्हणुन सातपुर विद्यालयाचे महाबळ सर व पुजा हिरे मॅडम यांनी काम बघितले.
सांस्कृतिक महोत्सवात  समूहगीत गायन, एकपात्री नाटिका व समुह नृत्य इत्यादी कला अविष्कार सादर करण्यात आले. समुहगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती जे‌. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड, द्वितीय क्रमांक जनता विद्यालय वडाळीभोई, समुह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जनता विद्यालय वडबारे, द्वितीय क्रमांक जनता विद्यालय वडाळीभोई, एकपात्री नाटीकेत प्रथम क्रमांक श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय चांदवड, द्वितीय क्रमांक जनता विद्यालय सुतारखेडे यांनी प्राप्त केला.प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त शाळा जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होतील. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक रमन गायकवाड व प्रा.हरी बच्छाव  यांनी केले.
बक्षिस वितरण प्रसंगी सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर एस एन जेबी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, ॲड. राजेंद्र ठाकरे, विजय कोतवाल, अशोककाका व्यवहारे विजय जाधव, डॉ सतिष गांगुर्डे, सुनिलआण्णा सोनवणे, प्रकाश शेळके, सुनिल तात्या कबाडे तांदळे साहेब ॲड. सुदर्शन पानसरे, कैलास सोनवणे तसेच मविप्रच्या चांदवड तालुक्यातील शाखांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी जे आरजी विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे, सुपरवायझर गरुडसर तसेच, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments