चांदवड :- नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी चांदवड शहरात लागु करण्यात येणाऱ्या सन २०२४-२५ ते सन २०२७-२८ चतुर्थ वार्षिक प्रस्तावित वाढीव मालमत्ता कराच्या पाठवलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिशीबाबत च नागरीकांनी आक्षेप नोंदवला आहे नगरपरिषेमार्फत सुनावणी साठी आपण ज्या हरकतदार नागरिकांना नोटीस पाठवल्या आहेत त्या आपण १०/१२/२०२४ रोजी तयार केलेल्या आहे वाढीव घरपट्टीस ज्या नागरिकांनी हरकती घेतलेल्या होत्या त्या नागरीकांना आपण काहींना ११ तारखेला तर काही नागरिकांना १२ तारखेला नोटीस पाठवलेल्या आहे व त्यांना सुनावणीसाठी हजर रहाण्यासाठी १३ तारीख दिलेली आहे सदरची नोटीस कायद्याच्या दृष्टीने ८ दिवस अगोदर देणे आवश्यक होते जेणेकरून नोटीस धारकास कागदपत्रांची जमवाजमव करण्यास काही दिवसांचा कालावधी मिळणार होता आपण दिलेल्या अल्प कालावधीत मालमत्ता धारकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास कमी अवधी मिळाला आहे म्हणून आम्ही सर्व नोटीस धारक चांदवडकर नागरिक आपणास विनंती करतो की आजची सुनावणी स्थगित करून नव्याने नोटीस पाठवून त्यानंतर ८ दिवसांनी पुढील सुनावणी घ्यावी जेणेकरून हरकत धारक चांदवडकर नागरिकांना आपलं म्हणणं व्यवस्थित रित्या आपल्यासमोर मांडता येईल .सदरच्या निवेदनावर मोहन काका शर्मा, सचिन (गुड्डू) खैरनार,राजाभाऊ अहिरे, भुषणशेठ पलोड, राहुलदादा कोतवाल, गुल्लूभाई घासी, रिजवानभाई घासी, अनिलदादा कोतवाल,डॉ. संजय कोकणे, आझादभाई, डॉ.प्रसाद कापडणी, प्रमोद कापडणी, किसनराव सूर्यवंशी, आदेश डुंगरवाल, गुजराथी काका , बबलूभाई कुरेशी, कापडिया, सागर सूर्यवंशी, श्रीमती वाघताई, श्रीमती आफ्रेताई, गोरख सूर्यवंशी, कोतवाल काका आदींसह हरकातदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरच्या सुनावणीच्या वेळी नगररचना विभागाचे अधिकारी मुख्याधिकारी व करवसुली अधिकारी यांच्यात व हरकतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला हरकतदारांनी विविध प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले व सुनावणी स्थगित करण्याची मागणी लावून धरली.
Post a Comment
0 Comments