Type Here to Get Search Results !

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी विद्यालयात उत्साहात साजरी....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- शिक्षणतज्ञ महात्मा फुले यांना अभिवादन करत विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. 
या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांनी  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महिला शिक्षित होण्यामागे त्यांचा दूरदृष्टीकोन होता व महिला शिकली तर कुटुंबाबरोबरच राष्ट्रहित सुद्धा साधले जाते असे मत व्यक्त करत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश देवरे यांनी केले. तर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारी मनोगते व्यक्त केली.
तर आभार प्रदर्शन संगीता चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी नियोजन लोकेश जैन, विकास गवळी यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments