Type Here to Get Search Results !

श्रीमती.जे.आर.गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाल, चांदवड येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन............. शैक्षणिक

सदगुरू रक्षा न्युज, चांदवड 
चांदवड:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या चांदवड येथील श्रीमती जे.आर.जी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लोहकरे, व्यासपीठावर पर्यवेक्षक  गरुड सर तसेच कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोहकरे सर यांनी न्यायशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा याविषयी बाबासाहेबांचे विचार सांगितले. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक गरुड सर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांची राज्यघटना आणि त्यांना घटनेचे शिल्पकार, का म्हणून संबोधले जाते याविषयी आपले विचार मांडले जातीभेद, अन्याय विरुद्ध लढा, मानवी हक्कांचा कैवारी,जागतिक दर्जाचे भारतीय अर्थतज्ञ,कायदे पंडित राजनीति तज्ञ, लेखक,गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महामानव,महायोद्धा तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर करून समाज हितासाठी अकल्पनीय काम करणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न भारतरत्न यांसारख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यालयाचे उपशिक्षक ठाकरे सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments