Type Here to Get Search Results !

चांदवड तालुक्यात शेतकऱ्याची गांजाची शेती, टमाट्याच्या शेतीत गांजा चे घेतले आंतरपीक .

( सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे (दिघवद ) चांदवड )

 चांदवड :तालुक्यातील वडनेर भैरव गावाच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांजा पीक आंतरपीक घेतांना आढळून आल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे १३ लाख रुपये किमतीची २१५ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. यात संशयितास अटक करण्यात आली. वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपनपाडा, दूधखेड शिवारात येथील एक शेतकरी संशयित गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व वडनेर भैरव येथील पोलीसांना मिळाली त्यामुळे या ठिकाणी छापा टाकण्यात आला.
वडनेर भैरव पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांजाची झाडे आढळल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलीस यांच्या संयुक्त कारवाई दरम्यान पोलीसपथक यांनी संयुक्त कारवाई केली व गांजाची झाडे जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी बुधवारी तपनपाडा,दूधखेड शिवारात रवींद्र नामदेव गांगुर्डे (वय ४०, रा. तपनपाडा) यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक ८३ व ८४ या ठिकाणी छापा टाकला. यावेळी २१५ किलो वजनाची व बारा लाख ९३ हजार ६० रुपये किंमतीची पासष्ट गांजाच्या झाडांचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला. यातील संशयित रवींद्र गांगुर्डे हा त्याच्या शेतात टोमॅटो पिकाच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीर रित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने शेतीत झाडे लावून त्याची वाढ करताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. गुन्ह्यातील संशयित रवींद्र गांगुर्डे याच्याविरुद्ध यापूर्वीही वडनेर भैरव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. संशयित गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता, याबाबत पोलिसांचा सखोल तपास चालू आहे. याकारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, मालेगावचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुर्वे, वडनेर भैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, हवालदार सुधाकर बागूल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments