Type Here to Get Search Results !

संविधान उद्देशिका वाचन करत श्री नेमिनाथ जैन विद्यालयात संविधान दिन साजरा....

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड:- आपल्या देशात संविधान लागू करून 2024 या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, उपप्राचार्य देवेंद्र राज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांनी संविधान पुस्तिकेला पुष्पहार अर्पण करत संविधानातील हक्क आणि कर्तव्य याविषयी माहिती देणारे मनोगत व्यक्त केले. 
तर विद्यालयाचे उपशिक्षक रोशन नेरकर यांनी संविधान दिनाचे प्रास्ताविक केले. विद्यालयातील उपशिक्षिका दिपाली हिरे यांनी संविधान उद्देशिकेचे विद्यार्थ्यांसमवेत सामूहिक वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा शुक्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ परदेशी यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यानी संविधानाचे महत्त्व सांगणारी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments