Type Here to Get Search Results !

चांदवड नगर परिषदेमार्फत प्रस्तावित लागू करण्यात येणाऱ्या वाढीव मालमत्ता करास (घरपट्टीस) चांदवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : शहरात प्रस्तावित लागु करण्यात येणाऱ्या वाढीव मालमत्ता (घरपट्टी) कराबाबत...
चांदवड नगरपरिषद यांनी सन २०२४-२५ ते २०२७-२८ या चतुर्थ वार्षिककर आकारणी करता चांदवड शहरातील सर्व करप्राप्त मालमत्ता धारकांचे पुन मूल्यांकन करून चांदवड नगर परिषदेच्या मार्फत करण्यात येणारी प्रस्तावित मालमत्ता (घरपट्टी) करवाढ ही चांदवड शहरातील सर्व नागरिकांना परवडण्यासारखी नाही.आपण आकारणाऱ्या नवीन दरांमुळे वार्षिक मालमत्ता (घरपट्टी) करात प्रचंड वाढ होणार आहे सदरचा वाढविण्यात येणारा मालमत्ता कर (घरपट्टी) सर्वसामान्य चांदवड कर नागरिकांना भरणे अवघड जाणार आहे नव्याने करण्यात येणारी प्रस्तावित करवाढ यात आपण आता दिवाबत्तीकर शिक्षणकर नवीनच वृक्षकर तसेच अग्निशमनकर यात देखील वाढ केलेली दिसत आहे आपल्या या प्रस्तावित वाढीव दरांमुळे चांदवड शहरांच्या मालमत्ता करात (घरपट्टीत) प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे ही होणारी वाढ सर्वसामान्य चांदवडकर नागरिकांना भरणे अवघड जाणार आहे आधीच प्रचंड महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवरती एक प्रकारे या वाढीव मालमत्ता करामुळे (घरपट्टीमुळे) अतिरिक्त बोजा पडणार आहे सदरच्या अतिरिक्त बोजामुळे सर्वसामान्य चांदवडकर नागरिकांना दैनंदिन जीवनात अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे सध्या आपल्या मार्फत आकारण्यात येणारी घरपट्टी व त्यावरील शास्तीची रक्कम ही देखील भरणे सर्वसामान्य चांदवडकराना अवघड झालेले आहे सर्वसामान्य चांदवडकर सध्या आपण आकारात असलेला मालमत्ता कर (घरपट्टी) सुद्धा भरू शकत नाही आपण प्रस्तावित केलेली व भविष्यात लागू करणार असलेली मालमत्ता कर (घरपट्टी) चांदवडकर नागरिक हा कसा भरेल याचा देखील आपण विचार करावा तसेच चांदवड शहरात आपल्या नगरपरिषदेमार्फत चांदवड शहरात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आहे का? ग्रीनजिम आहे का? जेष्ठ नागरिकांसाठी गार्डन आहे का? मुलांसाठी खेळाचे मैदान आहे का? सार्वजनिक मूत्रालय आहे का? जलतरण तलाव आहे का? सांस्कृतिक हॉल आहे का? तसेच चांदवडकर नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यात देखील नगरपरिषद असमर्थ ठरत आहे शहरातील रस्त्यांची अवस्था तर खूपच खराब झालेली आहे आपण कोणत्याच सुविधा चांदवड शहरातील नागरिकांना पुरविलेल्या नाही आपण आधी चांदवड करांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मग प्रस्थावित मालमत्ता कर (घरपट्टी) वाढवण्याचा विचार करावा तसेच ११९ अन्वये चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन विशेष नोटीस आपण चांदवड शहरातील सर्व मालमत्ता धारकांना नागरिकांना पाठवत आहात त्यामुळे चांदवडकर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे त्यात आपण उल्लेख केलेला आहे की २७/९/२०२४ पर्यंत चांदवड शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकांनी हरकत/आक्षेप अर्ज लेखी म्हणणं नगरपरिषदेत सादर करावे लेखी म्हणणं सादर केलं नाही तर प्रस्तावित मालमत्ता (घरपट्टी) कर वाढ आपणास मान्य आहे असे समजण्यात येईल आपण ही अट तात्काळ रद्द करावी कारण आम्हाला आपण प्रस्तावित केलेली मालमत्ता (घरपट्टी) करवाढ मान्य नाही तसेच चांदवड शहरातील प्रत्येक मालमत्ता धारक प्रत्येक चांदवडकर नागरिकाला आपल्या नोटीशीला लेखी उत्तर देणे शक्य नाही तसेच हरकत घेण्यासाठी आपण टाकलेल्या अटी व शर्ती पूर्णतः चुकीच्या आहेत नागरिकांनी २०२२/२०२३ पर्यंत मालमत्ता कर (घरपट्टी) भरलेली असेल अशाच नागरिकांची आपण हरकत ग्राह्य धरणार आहात हे पूर्णतः चुकीचे आहे चांदवड शहरातील प्रत्येक मालमत्ता धारक हा तो थकबाकीदार का असेना त्याला देखील सदरच्या प्रस्तावित वाढीव मालमत्ता (घरपट्टी) करबाबाबत मत मांडण्याचा व हरकत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे आपण उल्लेख केलेला सर्व जाचक अटी व शर्थी या रद्द करण्यात याव्यात व सरसकट चांदवड शहरातील सर्व मालमत्ता धारकांच्या हरकतींचा स्वीकार करावा अथवा ११९ ची चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन विशेष नोटीसच रद्द करण्यात यावी तसेच सदरची मालमत्ता (घरपट्टी) करवाढ करूच नये या विषयावर चांदवड शहरातील सर्व नागरिकांची एक बैठक आयोजित करून शहरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती,व्यापारी बंधु तसेच इंजिनीयर असोसिएशनचे पदाधिकारी पत्रकार बंधू सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन प्रस्तावित वाढीव मालमत्ता (घरपट्टी) कराची सविस्तर इतिवृत्त माहिती द्यावी सदरच्या निवेदनावर आपण ७ दिवसात खुलासा करावा अन्यथा चांदवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने समस्त चांदवडकरांना सोबत घेऊन नगरपरिषदेच्या विरोधात जनहितार्थ व्यापक असे जनआंदोलन उभे करू याची नोंद घेऊन आम्ही केलेल्या सूचनेचा आपण गांभीर्याने विचार करावा ही विनंती सदर निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख श्री.प्रसादभाऊ प्रजापत शिवसेना शहर संघटक श्री.सचिन (गुड्डू) खैरनार शिवसेना उप तालुकाप्रमुख श्री.सागरभाऊ बर्वे माजी नगरसेवक श्री राजकुमार संकलेचा माजी सरपंच श्री.विजूकाका कोतवाल जेष्ठ नेते श्री.अशोककाका व्यवहारे शिवसेना उप-शहरप्रमुख श्री.मनोजभाऊ जाधव श्री.धीरज संकलेचा शिवसेना उप-शहरप्रमुख श्री.तोसिफभाई शेख श्री रविंद्र शिरसागर श्री पिंटू बर्वे श्री शामराव सूर्यवंशी श्री मोनू कासलीवाल वंचित आघाडीचे श्री मंगेशभाऊ केदारे श्री योगेशभाऊ जगताप श्री संतोष भाऊ बनकर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments