Type Here to Get Search Results !

निफाड खडकमाळेगाव ते चांदवड राज्य महामार्गाचे नव्याने केलेले हायब्रीड रस्त्याचे काम नित्कृष्ट.......... प्रवासी व नागरीकानी केले डांबरी रस्त्यावरच वृक्षारोपन

जिल्हा प्रतिनिधी : आर.के. मामा ( राजेंद्र खांगळ )
चांदवडः निफाड खडकमाळेगाव ते चांदवड राज्य महामार्ग हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय नांदगाव यांचे अंतर्गत झालेला असुन सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय निफाड यांचेकडे दत्तक स्वरूपाने वर्ग करण्यात आलेला आहे. हा रस्ता ताब्यात घेतांना या निफाड विभागाचे उपअभियंता घोडे साहेब व शाखा अभियंता वाघ साहेब यांनी नित्कृष्ट दर्जाचा व काम अपूर्ण  असलेला रस्ता ताब्यात घेतांना तसा अहवाल तयार करून घेणे गरजेचे होते. 
परंतु सार्वजनिक उपविभाग नांदगाव वाले मलिदा खाऊन गेले .आणि त्याचप्रमाणे निफाड सार्वजनिक बाधकाम उपविभागाने कोळशांनी हात काळे केले. असा विचित्र प्रकार होऊन अखेर खराब नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचे पाप निफाड सार्व.उपविभागाच्या माथी आले. असे या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे झाले.   
निफाड खडकमाळेगाव ते चांदवड हा हायब्रीड स्वरूपाचा नव्या रस्त्याचे काम तीन वर्षापूर्वी केलेले असून या राज्य महामार्गाचे अपूर्ण असलेले काम आता तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले असून सदर रस्त्याला खड्डे पडून सर्व रस्ता फुटलेला असुन गणुर परसुल येथील वनीकरण दरम्यानच्या रस्त्याला तर अखंड तुटून खड्यांच्या स्वरूपात रस्ता दुभागलेला आहे. या रस्त्याचे काम या विभागांतर्गत नव्याने केलेले असुन या हायब्रीड रस्त्याचे काम नित्कृष्ट झालेले असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  या रस्त्याचे डांबरीकरण व खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करून नित्कृष्ट दर्जाचे रस्ता काम करणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदाराची पाठराखण न करता या विभागाने सखोल चौकशी करुन अपूर्ण कामे पुर्ण करण्यासाठी ठेकेदारावर कारवाई करावी असे परसुल, गणुर  व परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. सदर ठिकाणी पाच ते सहा अपघात झाले असून त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नच नागरीक व प्रवाशांना पडला आहे

Post a Comment

0 Comments