Type Here to Get Search Results !

नासिक ग्रामीण पोलीस यांना ७५ मोटर सायकलचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते वाटप

सदगुरू रक्षा न्युजः कैलास सोनवणे (दिघवद )
 नासिकः नाशिक ग्रामीण पोलिस दलास प्राप्त झालेल्या नवीन 75 मोटार सायकलचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते, तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे उपस्थितीत आज रोजी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीरा परेड मैदान, आडगाव याठिकाणी संपन्न झाला.नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण ४० पोलीस स्टेशन, ०८ उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालये, तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभाग अशी एकूण ५० कार्यालये व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुनारे १५,००० चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्हा ग्रामीण पोलीसांकडे वाहनांची कमतरता भासत होती, उपलब्ध असलेली वाहने मोठया प्रमाणावर निकामी झाल्याने पोलीस ठाण्यांच्या एकंदर कामकाजावर त्याना विपरीत परिणाम होत होता. तसेच जिल्हयातील अतिदुर्गम भागांमध्ये कामकाजासाठी दुचाकी वाहनांची आवश्यकता होती.नागरीकांच्या तक्रारीची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी डायल ११२ ही योजना कार्यन्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत नागरिकांच्या तक्रारीची गाहिती शिघ्रतेने त्या त्या जिल्हयांच्या नियंत्रण कक्षात थेट पुरवली जाते, सदर माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाल्यानंतर अशी माहिती अगदी कमी कालावधीत संबंधीत कॉल करणा-या व्यक्तीच्या अधिक जवळ असणा-या वाहनास पुरवली जाते. नागरीकांच्या तक्रारींची शिघ्रतेने दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी ग्रामीण पोलीस दलास दुचाकी वाहनांची असणारी गरज आणखी वाढली होती. सदरची बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांनी वाहनांबाबतची मागणी जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समितीकडे नोंदवली होती. ग्रामीण पोलीस ब्लास वाहनांची असलेली निकडीची गरज लक्षात घेवून मा मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, नाशिक जिल्हा मा. ना. श्री. दादाजी भुसे यांनी सदर कामास प्राधान्याने मंजुरी देत सदर कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याने नाशिक ग्रामीण पोलीस दलास ४५ होंडा शाईन मोटर सायकल प्राप्त झाल्या आहेत, तसेच मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून ३० बजाज पल्सर मोटर सायकल अशा एकुण ७५ नवीन मोटर सायकल ग्रामीण पोलीस दलात दाखल झाल्या आहे. सदर मोटर सायकलचा वापर करून ११२ चे कॉल अथवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जाणार नाही अशा ठिकाणी वेळेत पोहोचून नागरीकांना मदत करणे शक्य होणार आहे. नवीन कायद्याचे अंमलबजावणी व त्याकरीता आवश्यक असलेले वाहने ही उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हयातील दुर्गम भागात राहणारे नागरीकांना मदत करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, रात्रगस्त, विविध प्रकारचे बंदोबस्त, नाकाबंदी, गुन्हेगार शोध मोहिम, याबरोबरच पीडीतांचे कॉल स्वीकारून त्यावर शिघ्रतेने कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी नाशिक ग्रामीण पोलीस दलात अनुकंपा तत्वावर भरती झालेले एकुण १७ उमेदवारांना पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचे असते नियुक्त पत्र देण्यात आली यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण  विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीदाक आदित्य मिरखेलकर यांचे प्रमुख उपस्थितीत, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय  नितीनकुमार गोकावे, पोलीस उपअधीक्षक नाशिक ग्रामीण विभाग बापुराव बहस, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा विजय करे, पोलीस निरीक्षक  राजु सुर्वे, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा  दत्ता चौधरी यांचेसह पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments