चांदवड :- तिसगांव ता चांदवड येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक सन २०२४-२६ साठीच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडीकरिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी उपस्थित पालक यातून निवड करण्यात आलेल्या समिती सदस्यांमधून अध्यक्षपदाची माळ ही सर्वानुमते एका महिलेच्या गळ्यात पडली यावेळी अध्यक्षपदी सौ.वैष्णवी गोकुळ (नवनाथ महाराज) गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि उपाध्यक्षपदी भावराव वामन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शालेय व्यवस्थापन समिती महिला अध्यक्ष म्हणून निवड अत्यंत आदर्शवद निर्णय झाला त्यामुळे आनंदाचे वातावरण झाले होते, आजच्या या पालक मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी उपसरपंच तथा मावळते अध्यक्ष अण्णा मारुती गांगुर्डे हे होते व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.थोरमिसे यांनी केले आणि मेळाव्यात नवीन शालेय व्यवस्थापन समितीची निवड करणे, मॉडेल स्कूलविषयी चर्चा करणे, विद्यार्थी लाभ योजनेची माहिती देणे आणि शाळा निर्लेखन आणि नवीन इमारत बांधकाम यांवर चर्चा साधक बाधक चर्चा करण्यात आली, या निवडप्रक्रिये दरम्यान समितीवर शिक्षण तज्ञ म्हणुन गावातील उच्चशिक्षित नेतृत्व ॲड.भुषण संजय गांगुर्डे, शिक्षक प्रतिनिधी म्हणुन श्री बरकले यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आणि १ ली ते ७ वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांतील सदस्य म्हणुन श्री.गोरख बाबुराब निकम,बापु बबन गांगुर्डे,गोरख रामदास वाघमारे,विजय पंढरीनाथ गांगुर्डे, तुषार श्रावण गांगुर्डे,वैशाली गणेश गांगुर्डे,कावेरी दत्तात्रय गांगुर्डे,संगीता बाळू केदारे यांचीही बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली
नवनियुक्त अध्यक्ष सौ.वैष्णवी गांगुर्डे यांचा सत्कार मावळते अध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच आण्णा मारुती गांगुर्डे यांनी तर उपाध्यक्ष भावराव सोनवणे यांचा सत्कार माजी समिती सदस्य विकास आण्णा गांगुर्डे व शिक्षण तज्ञ ॲड.भुषण गांगुर्डे यांचा सत्कार माजी सरपंच शांताराम बापु गांगुर्डे यांनी केला.
यावेळी अनेक पालक मेळाव्यास उपस्थित होते...
नवनिर्वाचित अध्यक्ष वैष्णवी गांगुर्डे बोलताना म्हणाल्या की, की,शाळेची विकासात्मक वाटचालीस आपण जोमाने प्रयत्न करणार असून, तालुक्याच्या पटलावर तिसगांवच्या शाळेचे नाव घेऊन जाण्यासाठी जबाबदारी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मिळाली असून त्या पदाला योग्य तो न्याय देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास सदैव प्रयत्नशील राहील.
यावेळी संत निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, संत शिरोमणी सावता माळी महाराज देवस्थान तिसगांवचे अध्यक्ष शांताराम गांगुर्डे विकास सोसायटी तिसगांवचे चेअरमन गंगाधर गांगुर्डे माजी सरपंच दौलत माळी,पाणी फाउंडेशन चांदवड तालुका समन्वयक राजेंद्र गांगुर्डे,व्हाय चेअरमन निवृत्ती गांगुर्डे,साहेबराव निकम,दत्ता गांगुर्डे,दत्तात्रय बच्छाव,योगेश गांगुर्डे,व शिक्षक विद्यार्थी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments