चांदवडःशहरातील हमाल मापारी कॉलनी येथे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तमाल मापारी कॉलनीतील संतप्त महिला व नागरीकांनी रस्त्यावरच झाडांचे वृक्षारोपन केले. व चांदवड नगरपरिषदेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली शहरातील ही कॉलनी फक्त नगरपरिषदेचे कर भरण्यासाठीच आहे का? असा स तप्त सवालच महिलावर्गाने केला. रस्त्यांची दुरावस्था स्ट्रीटलाईट नसणे, पाण्याची समस्या या सर्वच प्रकारात सापत्नपणाची वागणुकच नगरपरिषद या हमाल मापारी कॉलनीसाठी वापरत असल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे चांदवड शहरातील हमाल मापारी कॉलनी येथे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. रस्त्याची चाळण झालेली आहे. मागील 10 ते 15 वर्षापासून येथील रहिवासी या समस्येचा सामना करत आहे.हा वरदळीचा रस्ता असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यात जागो जागी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने या रस्त्यावरून चालताना दुचाकी वाहने घसरून वाहन चालक खाली पडतात व जखमी होतात. तसेच ह्या रस्त्यावरून पायी चालताना देखील कसरत करत चालावे लागते तसेच या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी सासल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही व खड्डे चुकवताना वाहनांचा अपघात होतो. या खड्ड्यांच्या त्रासामुळे येथील नागरिक अत्यंत संतप्त झालेले आहेत व येथील रहिवाशांमध्ये रोष निर्माण झालेला आहे .येथे लवकरात लवकर चांगल्या दर्जाचा रस्ता बांधण्यात यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत शासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, अशा प्रकारचा इशाराच देण्यात आला. यावेळी सर्व महिला व रहिवासी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रत
१. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई
२. मा.आमदार चांदवड - देवळा तालुका, ३. मा.जिल्हाधिकारी साहेब, नाशिक
४.मा.उपविभागीय अधिकारी , चांदवड
५.मा तहसीलदार, तहसील कार्यालय ,चांदवड.
६. मा. पोलीस निरीक्षक सौ, चांदवड पोलीस स्टेशन,
यावेळी राजाभाऊ आहिरे, अजय पाटील, रमेश जाधव, रोहीदास ठाकरे, अरुणा पाटील, रेखा शिंदे, मंगल सुर्यवंशी, निर्मला जाधव, चंद्रकला पाटील, दिया पवार, शितल पवार, निर्मला नेमनार, छाया परदेशी, मेघा पवार, यांचेसट हमाल मापारी कॉलनीतील महिलावर्ग व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments