Type Here to Get Search Results !

श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना...

सदगुरू रक्षा न्युज : संपादक
श्रीमती जे. आर. गुंजाळ माध्य. व उच्च माध्यमिक चांदवड विद्यालयात विज्ञान छंद मंडळाची स्थापना  करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. संजय लोहकरे  होते .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भालचंद्र पवार  होते .कार्यक्रमाची सुरुवात स्वागत  गीताने झाली. विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती ज्योती जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी दहावीतील विद्यार्थी सेजल आवारे ,आदित्य शिंदे यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व सांगितले.विज्ञान शिक्षिका ठाकरे .के .डी यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्व विध्यार्थ्यांना पटवून दिले.इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांमधून कार्यकारिणी नेमण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ पवार यांनी वैज्ञानिक् माहिती,वैज्ञानिक् दृष्टिकोन याबद्दल माहिती दिली.यावेळी मुख्याध्यापक लोहकरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात शास्रज्ञ जयंती-पुण्यतिथी, प्रश्नमंजुषा ,शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन,विविध स्पर्धा ,याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विज्ञान शिक्षक गायकवाड सर यांनी आभार मानले .कार्यक्रमाच्या शेवटी सर्व् विद्यार्थी व विज्ञान शिक्षक यांनी विज्ञान प्रतिज्ञा घेतली .

Post a Comment

0 Comments