Type Here to Get Search Results !

चांदवड येथील प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी.

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड :  येथील प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगरिका चतुर्थी निमित्त गणेश दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केल्याने हजारो भाविकांनी श्रीं चे दर्शन घेतल्याची माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष श्री राजेन्द्र शर्मा यांनी दिली.यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक पूजन करण्यात आले नवीन पोशाख घालण्यात आला श्रींच्या मूर्तीस  सोन्या चांदीच्या आभूषणे चढविण्यात आली कार्यक्रमाचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी श्री अमोल दीक्षित गुरुजी यांनी केले आरती नंतर  सुमंगल उद्योग समूह मालेगावचे श्री संजय अण्णा हिरे यांच्या तर्फे खिचडी व केळी वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी अंगारीका चतुर्थीचा योग नव्हता आणि ह्या वर्षी देखील संपूर्ण वर्षभरात हा योग एकदाच आल्याने भाविकांनी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले मंदिर ट्रस्ट च्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात सोपे झाले मंदिर परिसर व गाभारा यावेळी विविध फुलांनी सजवण्यात आला होता यामुळे वातावरण अधिक प्रसन्न होते
दिवसभरात प्रशासकीय, राजकीय, सामाजिक,औद्योगिक अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी बाप्पाच्या दरबारी हजेरी लावली
नवजीवन रक्तपेढी नाशिक तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.सायंकाळी श्रीनाथ ट्रॅव्हलचे श्री श्रीकांत मंत्री सारिका मंत्री यांच्या श्रीरंग महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला .सायंकाळी ७ वा श्रीं चे सायं पूजन व आरती करण्यात आली रात्री चंद्रोदयाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिर प्रशासन ,चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पो.हवा. गुळेदादा व पोलीस कर्मचाऱ्यांसह चांदवड होमगार्ड तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Post a Comment

0 Comments