Type Here to Get Search Results !

दिघवद विद्यालयात लोकशाही पद्धतीने मंत्रिमंडळाची निवड.

सदगुरू रक्षा न्युज : कैलास सोनवणे दिघवद
चांदवडः श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित, स्वामी विवेकानंद विद्यालयात लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन वर्ग मंत्रीमंडळाची निवड करण्यात आली. संविधानाने आपल्यासाठी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणुका या लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे लोकशाही आम्हाला बलशाली बनवायची असेल तर निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे या दृष्टीकोनातून आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक, देशाचे भविष्य आहे. हे भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वांगीन ज्ञानाची गरज आहे. म्हणून मुलांना अगदी विद्यार्थीदशे पासूनच लोकशाही,मतदान आणि निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान करण्याची अनुभूती घेता यावी. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या नेतृत्व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.एम.पेंढारी,पर्यवेक्षक आय.आर.देवरे व उपशिक्षक एस.डी. गांगुर्डे यांचे मार्गदर्शनाखाली इयत्ता 9वीचे वर्गशिक्षक एस.जी. गांगुर्डे यांनी सर्व निवडणूक कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांचा उमेदवारी अर्ज,उमेदवारांना निशाणी,निवडणूक प्रचारासाठी वेळ, मतमोजणी या सर्व गोष्टींचे पारदर्शकपणे नियोजन केले आणि शाळेमध्ये मतदान केंद्र तयार करून केंद्रात विद्यार्थ्यांनीच निवडणूक अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.  ह्या निवडणुकीत वर्गातील विद्यार्थी उमेदवार कु. जयेश जेऊघाले आणि कुमारी गायत्री हांडगे यांची वर्गमंत्री म्हणून निवड झाली. मंत्रिमंडळात करण पवार, आदित्य हिरे, सपना शेळके गौरव गाढे संचिता ठोके, संजीवनी भूतणार मनोज मापारी, कृष्णा गांगुर्डे यांची निवड झाली. विजयी सर्व उमेदवारांचे शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक  तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कारभारी रसाळ व चिटणीस अण्णासाहेब भागुजी गांगुर्डे व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.
या निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून सार्थक गांगुर्डे निवडणूक अधिकारी म्हणून श्रेया झाल्टे, आदित्य खांगळ, गायत्री ठाकरे या सर्व विद्यार्थ्यांनी कामकाज बघितले. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक के. पी.गांगुर्डे, ए.पी.गांगुर्डे ,एस. जी.सोनवणे,   पी. डी. पेंढारी ,ए.आर.ठोंबरे  एस.व्ही.पाटील, एस. बी. गांगुर्डे ,जी. के. गांगुर्डे ,एस. ठाकरे ,एस.बी.राठोड मॅडम, के.कानडे ,के.ओ.साबळे ,एम. के.गोसावी,एस.यन.गांगुर्डे, डी. के.गांगुर्डे,ओ.आर.गांगुर्डे, एस.एम.घोलप  या सर्वांनी  प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments