सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड : चांदवड शहरातील गुरुकुल कॉलनी परिसरात एकच दिवशी 6 घरफोड्या झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच गुरुकुल कॉलनी,महालक्ष्मी नगर यांना गुजराथी नगरशी जोडणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने नाल्यालगत् व्यापारी सुनील जगताप यांचे घर ते गुजराथी नगर पाण्याची टाकी दरम्यान रस्त्यावर पूर्ण अंधार असतो.याबाबत गुरुकुल कॉलनी महालक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांनी आज नगरपरिषदेत निवेदन दिले असून या परिसरात लवकरात लवकर स्ट्रीट लाईट बसावीणे बाबत विनंती केली आहे.या निवेदनावर निलेश गुजराथी,सुनील जगताप,डॉ महेश क्षीरसागर,दादाभाऊ सोमवांशी,अमोल आहेर,दिलीप पवार, भाऊसाहेब हिरे यांच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments