चांदवड : चांदवड-देवळा मतदार संघातील महायुतीतील घटक पक्षांची चांदवड येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार व विद्यमान खासदार सौ भारतीताई पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली . यावेळी लोकसभेच्या पूर्वतयारी साठी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासनाने ज्या लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त मतदार राजांपर्यंत आपल्याला पोचवायच्या आहेत तशी आपण सर्वांनी यापुढे तयारी ठेवण्याची जबाबदारी घेऊन आपणास दिंडोरी मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत कसे पोहोचता येईल व आपल्या केंद्र सरकारने ज्या नवीन योजना चालू केलेल्या आहेत याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचलीच पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मा. केंद्रीय आरोग्य मंत्री व विद्यमान भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार यांनी केले. मतदार संघातील चांदवड देवळा या मतदारसंघातील महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी डॉक्टर भारतीताई पवार यांनी संवाद साधला व उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.यावेळी तालुक्याचे आ. डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ, भाजपाचे जिल्हा नेते केदानाना आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, डॉ नितीन गांगुर्डे, प्रशांतआप्पा ठाकरे, मनोज शिंदे, रोशनीताई कुंभार्डे, बाळासाहेब माळी, अशोककाका व्यवहारे,डॉ. उमेश काळे, मोहन शर्मा, वाल्मीक वानखेडे, सुनील शेलार, नाना विसपुते, राहुल हांडगे, विजय धाकराव, गोरख ढगे, शांताराम भवर यांचे सह महायुतीतील मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments