Type Here to Get Search Results !

व्हीके पिकअप बॉडीबिल्डर फॅब्रीकेशन या नविन फर्मचा उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात


 
 चांदवड : आज दुगांव येथे व्हीके पिकअप बॉडीबिल्डर फॅब्रीकेशन ॲण्ड गॅसवेल्डींग या फर्मचा उदघाटन सोहळा आपले आजी व आजोबा श्री पांडुरंग आनंदा सोनवणे व आजी सारजाबाई यांचे हस्ते करून दुगाव येथील प्रसाद व केशव कैलास सोनवणे या युवकांनी वेगळाच व तितकाच नाविन्यपूर्ण उपक्रम करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला.
सदर फर्मचे सत्यनारायण पुजन डॉ सुनिल पांडुरंग सोनवणे व त्यांच्या पत्नी गीतांजलीताई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालुक्यातील, पंचकोषीतील व दुगांव येथील आप्तेष्ठ, नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आलेल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई कैलास सोनवणे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ विसपुते, निफाड तालुका अध्यक्ष संजय भाऊ मोरे, चांदवड तालुका सरचिटणीस भागवत झाल्टे, तालुका उपाध्यक्ष छायाताई बिडवे, नांदगाव तालुका अध्यक्ष कल्पनाताई दराडे , मनमाड शहराध्यक्ष रोहिणी ताई गागरे, उपशाहराध्यक्ष दत्तात्रय खैरनार, संघटक शितलताई शेळके, मनमाड शहराध्यक्ष सचिन भाऊ शिरूड, मनमाड उपशहराध्यक्ष देवाभाऊ शेळके,वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पवनभाऊ दराडे यांचे सह दुगाव येथील सरपंच उपसरपंचव सर्व सदस्य, पोलीस पाटील यांचे सह आलेल्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक व मित्र परिवार यांनी सदर फर्मच्या उदघाटनास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments